Mumbai police cracks down on all-out operation,

कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती अशीच कायम राहिली आणि लोक सूचनांचे पालन करत नसतील तर पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला.

  मुंबई : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार असून कोरोनाचे वाढते रूग्ण धोक्याची घंटी ठरत आहेत. मुंबईत सर्वत्र पोलिसांनी गस्त वाढली आहे. तर, मास्क न घालणाऱ्यांवर मार्शल पथकाने कारावाईची मोहिम तीव्र केली आहे.

  कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती अशीच कायम राहिली आणि लोक सूचनांचे पालन करत नसतील तर पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला.

  गेल्या महिन्यापासून राज्यात पॉजिटिव्हीटी रेटमध्ये ४.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मुंबईचा पॉजिटिवीटी रेट १.५ टक्क्यांनी वाढला आहे. औरंगाबादनंतर आता मुंबईतही नाईट लॉकडाऊन (कर्फ्यू) करण्याचे संकेत मिळाले आहेत. पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी यांनीही रात्रीचे निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असे म्हटले आहे.

  कोरोनाचा राज्यात शिरकाव होऊन सुमारे एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरनंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट दिसून येत होती. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. ११ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान राज्यात पॉजिटिवीटी रेट ४.४८ टक्के होता. तर फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत हा रेट ९.७९ टक्क्यांवर पोहचला. मुंबईत ११ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत पॉजिटिवीटी रेट ३.१२ टक्के होता, तोच ११ ते ७ मार्चपर्यंत वाढून ४.७१ टक्क्यांवर पोहचला.

  लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होत आहे. त्यामुळे काही निर्बंध गरजेचे आहेत. सर्वांनी आपली नैतिक जबाबदारी समजून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी म्हंटले आहे.

  कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे, परंतु, परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आहे. रात्रीच्या वेळी निर्बंध लागू शकतील, असेही होऊ शकेल. रात्रीचे निर्बंध लागले तरी लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे.

  कोरोना विषाणूने आपले रूप बदलले नाही ना, याची तपासणी केली पाहिजे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. जर विषाणू म्युटेट होत असेल तर काही निर्बंध गरजेचे आहेत. संसर्ग वेगाने पसरत आहे. ट्रेन आणि विमानात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. लग्न, पार्टी व इतर समारंभ प्रशासनाच्या परवागनीशिवाय होऊ नयेत. सोहळ्यात २० हून अधिक जणांना एकत्र येण्यास मज्जाव करावा, जर नवा स्ट्रेन मिळत असेल आणि रूग्णसंख्या कमी होत नसेल तर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे काही तज्ञांचे मत आहे.