शेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का?, शरद पवारांचा सवाल

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी (Farmers) या कायद्याविरोधात दिल्लीच्या (Delhi Border) वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का? असा सवाल शरद पवार (Sharad Pawar)  यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई :  केंद्र सरकारने तीन कृषी (Agriculture Laws) कायदे आणले. या कृषी कायद्याविरोधात पंजाब (Punjab ) आणि हरियाणामध्ये (Hariyana) नाराजीचा सूर उमटला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी (Farmers) या कायद्याविरोधात दिल्लीच्या (Delhi Border) वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलना निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का? असा सवाल शरद पवार (Sharad Pawar)  यांनी उपस्थित केला आहे.

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे. असं असताना देशातील विरोधी पक्ष मात्र अजून एकत्र येत असल्याचे चित्र नाही. कालच विरोधी पक्षातील शरद पवार, राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि डी.राजा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात पंजाबमधील अकाली दलाचा समावेश मात्र नव्हता.

दुसरीकडे पंजाब मधील अकाली दल देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अकाली दलातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. असं असलं तरी सर्व पक्ष अजूनही शेतकरी कायद्याविरोधात ही एकत्र येताना दिसत नाहीये.

२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात कोणी इतका आवाज उठवला नव्हता जेवढा आता शेतकऱ्यांनी उठवला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे पण देशातील विरोधी पक्ष मात्र अजूनही चाचपडत आहे. काँग्रेस पक्षातील अध्यक्ष कोण इथून सुरुवात आहे. तर प्रादेशिक पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली एकत्र येतील हा प्रश्न अनुत्तरित आहेत.असे शरद पवार म्हणाले.