उद्धव -राज एकत्र येणार का ? राज ठाकरे काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली.

    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे यांना या प्रश्नावर पुन्हा डिवचण्यात आलं. यावेळी त्यांनी दोनच शब्दात पण मिश्किल उत्तर दिलं. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार का? याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

    तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली. दैनिक ‘लोकसत्ता’ने राज ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर देतानाच उद्धव-राज एकत्र येणार का? या प्रश्नावरही उत्तर दिलं.

    दरम्यान “यंदाच्या महापालिका निवडणुकीत कुणाशी युती करणार का?” या प्रश्नला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल.”