मुंबईत वाईन शॉप आणि बार बंद राहणार; महापालिकेचा निर्णय

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. याचं पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यांन मुंबईतील सर्व वाईन शॉप आणि बार बंद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

    दरम्यांन वाईन शॉप आणि बार बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तळीरामांनी वाईन शॉपला प्रचंड गर्दी केली आहे. तसेचं दारुची पार्सल सेवाही बंद असणार आहे.त्यामुळे पुढील स्टॉक करुन ठेवण्यासाठी तळीरामांची धावपळ सुरु झाली आहे.

    कोरोना अटोक्यात यावा, यासाठी शासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात असले तरी, अजूनही अटोक्यात आलेला नाही, त्यामुळे शासनाने गर्दी होऊ नये, यासाठी कडक निर्बंध लाण्याचे ठरवले आहे.