शंकर नम यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे समर्पित नेतृत्व हरपले : नाना पटोले

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद असून त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी झटणारे समर्पित नेतृत्व काळाच्या काळाच्या पडद्याआड गेले, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

    मुंबई : माजी खासदार तसेच ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद असून त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी झटणारे समर्पित नेतृत्व काळाच्या काळाच्या पडद्याआड गेले, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

    आपल्या शोकसंदेशात पटोले म्हणाले की, शंकर नम यांनी आपल्या राजकीय कार्याची सुरुवात सरपंचपदापासून केली. त्यानंतर ते डहाणू पंचायत समितिचे सदस्य झाले. १९८५ साली डहाणू विधानसभा मतदारंसघातून ते प्रचंड बहुमताने निवडून आले. या मतदारसंघाचे त्यांनी १७ वर्षे नेतृत्व केले. तर एकदा लोकसभा सदस्य म्हणूनही विजय संपादन केला होता.

    सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास, खारजमीन, पाटबंधारे विभागाचे राज्यमंत्रीपद भूषवले तसेच ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

    शंकर नम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.