वोकहार्ट रुग्णालय मुंबई सेंट्रलने केली स्पुटनिक व्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

आमच्या शहरात अधिकाधिक लसीकरण करणे आणि कोविड १९ ची वाढ थांबविणे आहे. लसीकरण गंभीर आजाराचा धोका काढून टाकते आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका टाळतो. लसीकरण सकाळी ९.०० ते दुपारी ४: ०० या कालावधीत कोविन ॲपवर पूर्व नोंदणीसह उपलब्ध असेल.

    मुंबई : वोकहार्ट रुग्णालय, मुंबई सेंट्रलने बहुप्रतिक्षित स्पुटनिक व्ही लसीकरण मोहिम यशस्वीरित्या सुरू केली आहे. दोन डोस दरम्यान २१ दिवसाचे अंतर भारतात मंजूर झाले आहे. आम्ही मुंबईकरांना लसीचे विविध पर्याय दिले आहेत. वॉकहार्ट मुंबई सेंट्रल येथील मॅनेजमेंटने स्पुटनिक व्ही साठी अर्ज केला होता आणि आम्ही स्पुटनिक व्ही लस देण्यास आनंदित आहोत.

    कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या तीनही लसी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये मुंबईकरांना उपलब्ध आहेत. कारण आमचे लक्ष्य आमच्या शहरात अधिकाधिक लसीकरण करणे आणि कोविड १९ ची वाढ थांबविणे आहे. लसीकरण गंभीर आजाराचा धोका काढून टाकते आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका टाळतो. लसीकरण सकाळी ९.०० ते दुपारी ४: ०० या कालावधीत कोविन ॲपवर पूर्व नोंदणीसह उपलब्ध असेल.

    मुंबईतील लसीकरण मोहिमेवर बोलताना मुंबई सेंट्रल, वॉकहार्ट हॉस्पिटलचे प्रादेशिक प्रमुख डॉ पराग रिंदानी म्हणाले, “आत्तापर्यंत आम्ही मुंबईकरांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या लसी दिल्या आहेत, आता गेल्या २ दिवसापासून आम्ही स्पुटनिक व्ही लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दोन्ही वयोगटांसाठी स्पुटनिक व्ही लस देण्यासाठी कोविनॲप मार्फत २०० अपॉइंटमेंट्स बुक केल्या आहेत. लस घेणे हा स्वत: ला कोविडपासून वाचवण्याचा एकमात्र मार्ग आहे.”

    मार्च २०२२ पर्यंत सुमारे ३६० दशलक्ष भारतीयांना रशियन कोविड लस स्पुटनिक व्ही मिळेल. जागतिक स्तरावर २० दशलक्ष लोकांना स्पुटनिक व्हीचा पहिला डोस प्राप्त झाला आहे. जुलै महिन्यात भारताला स्पुटनिकचे १० दशलक्ष डोस मिळाले.

    Wockhardt Hospital Mumbai Central launches Sputnik V vaccination campaign