बेकायदेशीररित्या मुलांची विक्री करणाऱ्या महिलेला अटक ; कल्याण पोलिसांची कारवाई

मानसी ही काही महिने डोंबिवलीच्या बालसुधारगृहात काम करत होती. याठिकाणी काम करताना तिला मुलं दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या अनेकांचे फोन नंबर मिळाले. मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. तसंच मुल मिळण्यासाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागत असते. त्यामुळे ही महिला अशा पालकांना हेरून त्यांना या प्रक्रियेच्या गोंधळातून सोडवत मुले मिळवून देण्याचे काम करायची.

    बेकायदेशीररित्या मुलांची विक्री करणाऱ्या महिलेला अटक ; कल्याण पोलिसांची कारवाई

    कल्याण: बेकायदेशीररित्या मुलांची विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी कल्याणामधून अटक केली आहे. मुलं दत्तक (Adoption) घेण्याची इच्छा असणाऱ्यांना बेकायदेशीररित्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला बाल संरक्षण कक्ष आणि कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिटने ही कारवाई केली आहे.

    अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव मानसी जाधव असून मानसी ही काही महिने डोंबिवलीच्या बालसुधारगृहात काम करत होती. याठिकाणी काम करताना तिला मुलं दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या अनेकांचे फोन नंबर मिळाले. मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. तसंच मुल मिळण्यासाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागत असते. त्यामुळे ही महिला अशा पालकांना हेरून त्यांना या प्रक्रियेच्या गोंधळातून सोडवत मुले मिळवून देण्याचे काम करायची. पण प्रत्यक्षात ती गरीब पालकांकडून मुलं विकत घेऊन अशा पालकांना विकत होती. दोन्ही प्रकारच्या गरजू लोकांना हेरून तिनं हा गोरखधंदा सुरू केला होता.पोलिसांनी कारवाई करत या महिलेसह मुलाची विक्री करणाऱ्या पालकांनाही ताब्यात घेतले आहे.

    मानसीने बालसुधारगृहात मुल दत्तक घेण्यासाठी अर्ज केलेल्या एका कुटुंबाला संपर्क केला. आपल्याकडे एक ५ वर्षांचे बाळ असून ते २ लाखांत द्यायला तयार असल्याचे या महिलेने त्यांना सांगितले प्रत्यक्षात या महिलेने एका गरीब कुटुंबाला त्यांचे बाळ विक्री करण्यास राजी केले होते या महिलेने मुल दत्तक घेण्यासाठी कुटुंबाला विचारणा केली, त्यावेळी कुटुंबाला बेकायदेशीरपणे मुल दत्तक घेणे योग्य नसल्याची जाणीव झाली. त्यांनी याबाबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या विभागाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.

    पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनाच बनावट ग्राहक बनवले . शनिवारी सकाळी या बनावट ग्राहकांनी सदर महिलेकडून ५ महिन्याच्या बालकाची १ लाख ६० हजार आणि ३० हजार अशा १ लाख ९० हजारांत खरेदी केली. त्यानंतर या महिलेला आणि बाळाची विक्री करणाऱ्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले . महिलेने याआधीही काही बाळांची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. त्याची चौकसी सुरू करण्यात आली आहे.