रस्ता नसल्याने उपचारा अभावी महिलेचा मृत्यू

वळेवर उपचार न मिळल्यामुळं एका महिलेचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, याला कारण म्हणजे दरड कोसळून २४ तासाहून अधिक वेळ झाला तरीही रस्ता पुर्ववत न झाल्याने सिल्लीबाई पाडवी या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने, आणि रस्ता बंद असल्याने ती जिल्हा रूग्णालयात पोहोचू शकली नाही. व त्यात तिचा मृत्यू झाला आहे. तिचा पती खांद्यावर सिल्लीबाईला घेऊन अनवाणी फिरतोय अत्यंत ह्रदयद्रावक व दुदैवी अशी ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली येथे घडलीये

    नंदुरबार : जिल्ह्यातील चांदसैली येथे पावसामुळं मोठी दरड कोसळली आहे. दरड कोसळून २४ तासाहून अधिक वेळ झाला तरी, सुद्धा हा रस्ता पुर्ववत न झाल्याने सिल्लीबाई पाडवी या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरड पडली त्याठिकाणचा रस्ता बंद असल्याने, या महिलेला वेळेत उपचार न मिळाले नाहीत. तसेच . रस्ता बंद असल्याने ती जिल्हा रूग्णालयात वेळेवर पोहोचू शकली नाही, त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे.

    तिचा पती खांद्यावर सिल्लीबाईला घेऊन अनवाणी फिरतोय, अत्यंत ह्रदयद्रावक व दुदैवी अशी ही घटना घडलीये. बाधकाम विभागाने सतर्कता दाखवत वेळेत रस्त्याचे काम केले असते तर, त्या महिलेला वेळवर उपचार मिळून ती जगली असती, परंतू बांधकाम विभाग आणि प्रशासनाने वेळेत काम न केल्यामुळं हा दुदैवी प्रकार घडला आहे.

    या घटनेनंतर राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचे वाभाडे निघालेले पाहायला मिळताहेत. ग्रामीण भागात आरोग्यव्यवस्था सुदृढ असती तर सिल्लीबाईचा जीव वाचला असता असं भाजप, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे राज्याचे आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांच्या मतदारसंघातील ही घटना आहे.