मुंबईतील धक्कादायक घटना; महिलेवर बलात्कार करुन गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

    मुंबईमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला असून यावेळी आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

    या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

    मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पीडित महिला ३० वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे.

    घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर उपचार सुरु असून स्थिती सध्या खूप गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.