प्रेमाचा घात झाल्यामुळे धावत्या लोकलसमोर तरूणीला ढकललं, आरोपीला अटक; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सुमेध जाधव असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करतच अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो फेटाळून लावला.

    प्रेमात दगा फटका झाल्यामुळे रागाच्या भरात एका तरूणाने धावत्या लोकलसमोर तरूणीला ढकलल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाके पडले आहेत. खार रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून, हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सुमेध जाधव असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करतच अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो फेटाळून लावला.

    जखमी झालेली तरुणी आणि तिला धक्का देणारा तरुण दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे. परंतु दारूचं व्यसन असल्याचं तरूणीला समजल्यामुळे तिने लग्नाला नकार दिला. जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला १२ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.