Rickshaw driver rapes tourist girl in Mumbai

घरकामासाठी जाणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स जबरीने खेचून पळ काढणाऱ्या रिक्षा चालकाला अवघ्या चार तासांत चेंबूर पोलिसांनी शोध घेऊन अटक केली आहे. इब्राहिम हसन मेहेंदीकर (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भाई नगर, चेंबूर नाका येथील रहिवासी आहे आहे.

    मुंबई : घरकामासाठी जाणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स जबरीने खेचून पळ काढणाऱ्या रिक्षा चालकाला अवघ्या चार तासांत चेंबूर पोलिसांनी शोध घेऊन अटक केली आहे. इब्राहिम हसन मेहेंदीकर (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भाई नगर, चेंबूर नाका येथील रहिवासी आहे आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी फिर्यादी रीना आनंद (३२) या चेंबूर येथे नेहमीप्रमाणे घरकाम करण्यासाठी जात असताना फीर्यादी यांच्या पाठीमागून एक रिक्षा आली व त्यातील रिक्षा चालकाने फिर्यादी यांच्या हातातील पर्स जबरीने खेचून पळून गेला असता, या महिलेने तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षास सदरच्या रिक्षा बद्दल माहिती दिली.

    या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल होताच पर्यवेक्षक पोलीस निरिक्षक मनीषा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नाणेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पाेलीस नाईक उत्तम पाटील, पोलीस शिपाई प्रताप जाधव यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन सदर परिसरातील खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून संशयित रिक्षाचा शोध घेतला.