काहीही झाले तरी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करणार नाही, वळसे पाटलांचा कानाला खडा

पोलिसांना १०० कोटी दरमहा गोळा करण्याचं टार्गेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं होतं, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या टीकेनंतर देशमुखांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. नव्याने गृहमंत्रीपदी आलेले दिलीप वळसे पाटील यांनी आता पद स्विकारताच काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. 

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर नव्याने गृहमंत्रीपदी रुजू झालेल्या दिलीप वळसे पाटील यांनी आता ताकदेखील फुंकून पिण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतंय. सध्याच्या काळ हा आव्हानात्मक असून आपण पूर्ण निष्ठेनं गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडू, असं वळसे पाटील यांनी म्हटलंय.

    पोलिसांना १०० कोटी दरमहा गोळा करण्याचं टार्गेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं होतं, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या टीकेनंतर देशमुखांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. नव्याने गृहमंत्रीपदी आलेले दिलीप वळसे पाटील यांनी आता पद स्विकारताच काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.

    काहीही झालं तरी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करणार नाही, असं वळसे पाटील यांनी माध्यमांना सांगितलंय. आपण आपली जबाबदारी ओळखून काम करू असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानलेत.

    सध्या राज्यावर कोरोनाचं संकट आहे. पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. एकीकडं कोरोनाचं संकट असताना सणासुदीचा काळदेखील सुरू होत आहे. विविध धर्मियांचे सणदेखील आहेत. त्यामुळेच आपल्यापुढं मोठी चॅलेंजिंग परिस्थिती असल्याचं वळसे पाटील यांनी म्हटलंय.