वर्क फ्रॉम होममुळे जीवाला धोका; डब्ल्यूएचओचा गंभीर इशारा

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एनव्हायरमेंट इंटरनॅशन (आयएलओ) या संस्थांनी याबाबतचे एक संशोधन केले. तासनतास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल अभ्यास करुन हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 'जास्त वेळ काम करणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे,' असा निष्कर्षही या अहवाल काढण्यात आला आहे.

  मुंबई : मागील दोन वर्षांपासून जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. यामुळे अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मात्र, वर्क फ्रॉम होमचे कर्मचाऱ्यांवर भयंकर दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनातुन समोर आले आहे. वर्क फ्रॉम होममुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असून जीवाला धोका निर्माण होत आहे. डब्ल्यूएचओने हा गंभीर इशारा दिला आहे.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही अनेक जणांचे लसीकरण झालेले नाही. तसेच लॉक-अनलॉकची प्रक्रीया सुरु असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे घरातूनच काम सुरु आहे.

  मात्र, वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. घरातून काम करताना कर्मचारी जास्त वेळ काम करताना दिसत आहेत. तासनतास काम करणाऱ्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा आणि हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

  जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एनव्हायरमेंट इंटरनॅशन (आयएलओ) या संस्थांनी याबाबतचे एक संशोधन केले. तासनतास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल अभ्यास करुन हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ‘जास्त वेळ काम करणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे,’ असा निष्कर्षही या अहवाल काढण्यात आला आहे.

  तासनतास काम केल्यानं २०१६ पासून आतापर्यंत ७ लाख ४५ हजार जणांचा मृत्यू झाला. हृदयाशी संबंधित आजार आणि हृदय विकाराच्या झटक्यानं लाखो कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. कोरोना काळात तर ही समस्या आणखी गंभीर झाली आहे. गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत.

  अनेक जण कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काम करत असल्यानं स्क्रीन टाईम वाढला आहे. याचा गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. विशेत: पुरुषांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. कामामुळे येणाऱ्या मानसिक ताणाचा थेट संबंध हृदयाशी येतो. त्यामुळेच अधिक काम करणाऱ्यांना हृदय विकाराचा झटका येण्याचं प्रमाण जास्त आहे.