पालिकेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत वर्क फ्रॉम होम

मुंबई: मुंबई पालिकेच्या विभागात मोठ्या प्रमाणात कनेटन्टमेन्ट झोन आणि काही विभाग रेड झोन मध्येच असल्यामुळे महापालिका शाळेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे हा निर्णय घेतला.

 मुंबई: मुंबई पालिकेच्या विभागात मोठ्या प्रमाणात कनेटन्टमेन्ट झोन आणि काही विभाग रेड झोन मध्येच असल्यामुळे महापालिका शाळेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत पुन्हा वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे हा निर्णय घेतला.

 
मुंबईतील सध्याच्या स्थिती पाहता ८३३ कन्टेन्टमेन्ट झोन आहेत त्यामुळे १५ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळा सुरू होणे शक्य नाही. तसेच मुंबईत रेल्वे सेवा सुरु असली तरी त्यात शिक्षकांना प्रवेश नसल्याने वसई, विरार , पालघर , बद्लापूर, ठाणे अशा ठिकाणांहून येणाऱ्या शिक्षकांचे हाल होत आहेत.
 
 अनेक शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्याने तेथील शिक्षकांना शाळांच्या बाहेर उभे राहावे लागत होते. अनेक शिक्षक गावी आहेत मात्र वेतन कपातीच्या भीतीने ते खासगी वाहने करून मुंबईत परतावे लागत आहेत, अशा अनेक समस्यामुळे शाळा सुरु नसताना शिक्षकांना वर्क फ्रॉम होमच करू द्यावे अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांनी केली होती. 
 
शाळा कधी सुरु होणार याबाबत कोणतेही निश्चित तारीख नाही. यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी योग्यवेळी योग्य परिस्थिती पाहून घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत. पालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिक्षण सुरु आहे. त्यामुळे स्थानिक वाहतूक, शिक्षकांची सुरक्षा या साऱ्या बाबी लक्षात घेऊन ३० जूनपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या.
 
 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्यासाठी टप्याटप्याने बोलवायचे आहे. त्यासाठी नियोजन करत शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असेही म्हटले आहे.  ज्यांना नवीन पाठयपुस्तके मिळणार नाहीत त्यांच्यासाठी सध्या मागील वर्षीची पाठयपुस्तके संकलित करून द्यायला सांगितली आहेत. इ लर्निंग सुविधेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरातून व्हाट्सअप , झूम, टेलिग्राम , ट्विटर किंवा ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे असेही म्हटले आहे.