मुंबई पालिका निवडणुकीच्या कामाला लागा; राज्य निवडणूक आयोगाची परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने पालिका निवडणूक आता मुदतीत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने पालिका निवडणूक आता मुदतीत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    राज्य निवडणुक आयोग व मुंबई महापालिका निवडणुक विभागाची बैठक आज पार पडली. या बैठकीत निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ही तयारी प्रभागाच्या फेररचनेपासून सुरवात केली जाणार आहे.

    कोरोनाच्या दुस-या लाटेत मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्य़ाने वाढली. ही रुग्णसंख्या घटत असताना तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगर पालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा धोका काय़म असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत काय तयारी करावी अशा आशयाचे पत्र पालिकेने राज्य निवडणुक आयोगाला पाठवले होते. त्यानुसार सोमवारी राज्य निवडणुक आयोग व मुंबई महापालिका निवडणूक विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. याची सुरुवात प्रभांगाच्या फेररचनेने होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार ही फेररचना केली जाणार आहे.

    निवडणूक विभागाच्य़ा झालेल्या बैठकीत पालिका निवडणुकीची तयारी सुरु करायला सांगण्यात आले असून याची सुरुवात प्रभागाच्या फेररचनेपासून सुरवात होणार आहे. या प्रक्रियेनंतर प्रभागांचे आरक्षण, मतदार यादी अंतिम झाल्यानंतर बुथ निश्‍चित करण्यात येतील. असे राज्य निवडणुक आयुक्त यु.पी. स. मदान यांनी सांगितले. निवडणुक निश्‍चित कालावधी नुसार होईल यानुसारच सर्व कामे केली जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय परिस्थीतीनुसार होईल असेही मदान यांनी सांगितले.

    पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग रचना करण्यात आली. यावेळी शहर विभागातील सात प्रभाग कमी झाले होते. तसेच चेंबूर, घाटकोपर, भांडूप विक्रोळी वांद्रे पूर्व या भागातील प्रत्येक १ प्रभाग घटला होता. तर उत्तर मुंबईतील गोरेगाव, दहिसर येथील प्रत्येकी १ आणि मालाड कांदिवली येथील प्रत्येकी दोन असे प्रभाग वाढले होते.