रेल्वे बंद होण्याआधी घर गाठण्यासाठी कामगारांची धडपड; मुंबईतील रेल्वे स्थानंकावर घोळकेच्या घोळके दाखल

राज्य सरकारने पूर्ण लॉकडाउन लागू केलेला नसला तरी रेल्वे सेवा आणि इतर सेवा बंद पडण्याची भीती कामगारांना आहे, यामुळे त्यांना गेल्या वर्षीप्रमाणे समस्या निर्माण होऊ शकतात. लॉकडाऊन होण्याची शक्यता पाहता अनेक कामगार शहर सोडत आहेत. शहराबाहेर जाणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वे सेवा थांबण्यापूर्वी त्यांना शहर सोडायचे आहे, असे काही कामगारांचे म्हणणे आहे.

  मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप सर्वात जास्त पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनारुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे प्रवासी कामगारांच्या चिंतेत वाढ झाली असून ते पुन्हा परतीच्या वाटेवर निघाले आहेत. सरकारच्या या निर्णयाने आमच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिल असे अनेकांचे म्हणणे आहे.

  राज्य सरकारने पूर्ण लॉकडाउन लागू केलेला नसला तरी रेल्वे सेवा आणि इतर सेवा बंद पडण्याची भीती कामगारांना आहे, यामुळे त्यांना गेल्या वर्षीप्रमाणे समस्या निर्माण होऊ शकतात. लॉकडाऊन होण्याची शक्यता पाहता अनेक कामगार शहर सोडत आहेत. शहराबाहेर जाणाऱ्या कामगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वे सेवा थांबण्यापूर्वी त्यांना शहर सोडायचे आहे, असे काही कामगारांचे म्हणणे आहे.

  मागील वर्षाप्रमाणेच सध्या स्थानकांवर गर्दी दिसत नसली तरी मोठ्या संख्येने कामगार आपले घरे गाठण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. 2020 मध्ये हजारो स्थलांतरित कामगार बिहार, बंगाल आणि उत्तर प्रदेशसाठी रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करताना स्टेशनवर जमले होते. एका अहवालानुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कुर्ला येथून उत्तरप्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांच्या संख्येत गेल्या 2 दिवसात वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  रेल्वेत प्रवाश्यांची संख्या वाढली

  गर्दी व्यवस्थापनासाठी एलटीटीमध्ये तैनात असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या एका रक्षकाने सांगितले की, त्यांना गेल्या 2 दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. तथापि, गेल्या वर्षी देशभरातील लॉकडाऊनपेक्षा गर्दी खूपच कमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्याकरिता स्टेशनवर ना अग्रिम बुकिंग करण्यात आलील आहे. तसेच कोणतीही असामान्य भीड दिसत आहे. जेव्हापासून साथीचा रोग आला, तेव्हा गर्दी कमी करण्यासाठी आम्ही द्वितीय श्रेणीच्या डब्यांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग प्रणालीदेखील सुरू केली.

  ट्रेनमध्ये बसण्यासाठी लोकांना तिकिटांचे आरक्षण करावे लागते. प्रवाश्यांकडे वैध तिकिट असल्यावरच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल. ‘घर बचाओ घर बनओ’ या स्वयंसेवी संस्थेसाठी अंबुजवाडी येथे काम करणारे अखिलेश राव यांचे म्हणणे आहे की, त्यांना घरी परत यावे की नाही अशी विचारपूस करणाऱ्या परप्रांतीय कामगारांकडून घाबरुन फोन येत आहे. सरकारने अद्याप संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले नाही, परंतु या निर्बंधांमुळे बर्‍याच लोकांना नोकरी सोडावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

  महापे येथून येणारे काँक्रीट चालक सानू पटेल नवीन निर्बंधांदरम्यान एलटीटीला पोहोचले. गेल्यावर्षी देशव्यापी लॉकडाऊन लागल्यानंतर पटेल व त्यांचे अन्य साथीदार उत्तरप्रदेशात पायी परत गेले होते. गेल्या वर्षी मी जॉनपूरमध्ये माझ्या घरी पायी गेलो होतो. यावेळी, मला अशा परिस्थितीत अडकण्याची इच्छा नाही. शासनाच्या वतीने नवीन निर्बंध लादण्यात आल्याने यापुढे कोणतेही काम होणार नाही, असे वाहन मालकाने आम्हाला सांगितल्याचे, ते म्हणाले.

  पुन्हा गाड्या थांबवण्यापूर्वी आता माझ्याकडे काम नाही, त्यामुळे घराकडे परतलेलेच बरे. उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील आणखी एक परप्रांतीय मजूर सोहनलाल म्हणाले की, आपल्याकडे पैसे नाहीत आणि कामही नाही. कुहननगर एक्स्प्रेस (एलटीटी गोरखपूर) आपल्या गावी जाण्यासाठी सोहन लाल आणि त्याचे दोन मित्र एलटीटीला आले होते.