जागतिक परिचारिका दिनानिमित्त उद्या दुपारी १२ वाजता भारतभर परिचारिका मेणबत्ती, दिवा लावून करणार प्रार्थना

मुंबई : मंगळवारी १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन आहे, या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रासह भारतभर नर्सेस दुपारी १२ वाजता आपल्या घरात अथवा कामाच्या ठिकाणी मेणबत्ती अथवा दिवा लावून कोरोना

 मुंबई :  मंगळवारी १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन आहे, या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रासह भारतभर नर्सेस दुपारी १२ वाजता आपल्या घरात अथवा कामाच्या ठिकाणी मेणबत्ती अथवा दिवा लावून कोरोना युद्धयात  जोखमीच व सक्रीय काम करत असलेल्या परिचारिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणार आहेत. तसेच कोरोना प्रादुर्भाव लवकरात लवकर थांबावा याकारिता ही प्रार्थना करणार आहेत.  मुंबईतील जेजे हॉस्पिटल, कामा, सेंट जॉर्ज, जीटी  राज्यातील वैद्यकीय हॉस्पिटलमधे कार्यरत तब्बल २६ हजार पेक्षा अधिक परिचारिकांचा यात सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या  सेक्रेटरी कमल वायकोळे यांनी दिली.

कोरोना युद्धयात रात्र दिवस काम करत असलेल्या परिचारिकाना मात्र अनेक समस्याचा सामना करावा लागत असल्याची खंत फेडरेशनने व्यक्त केली आहे. नर्सेसना मुबलक साहित्य मिळावे ही मागणी अनेक वर्ष करत आहेत यात, मेडिसीन, साहित्य पुरवठा, मशीनरी, स्टेशनरिचा अभाव आहे. केंद्रीय आयोगाने नर्सेसच्या भत्त्यात वाढ केली असताना राज्य सरकार आजही अनेक भत्ते देतच नसल्याचे समोर आले आहे. यात विशेष भत्ता हा मागील अनेक वर्षांपासून दिला जात नाहिये, रात्रपाळी भत्ता मिळत नाहिये, याशिवाय पगारातदेखील तफावत असल्याचे ही फेडरेशनचे म्हणणे आहे.परिचारिकांची कामाची परिस्थिती जैसे थे आहे. यात बदल व्हावा ही मागणी ही अनेक वर्ष धूळ खात पडली आहे.

 मुंबईत राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या रुग्णालयांमध्ये सध्या अडीच हजारपेक्षा नर्सेस कार्यरत आहेत, या नर्सेस थेट कोरोना रुग्णांच्या संपर्कात येत असतात. त्यांना योग्य वैद्यकिय साहित्य मिळावे, सध्या विविध हॉस्पिटलमध्ये २० पेक्षा अधिक नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत, त्यांच्या सुरक्षेकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, पीपीइ किट घातल्यानंतर त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यमुळे कामाचे तास  कमी करावेत, एक दिवस सुट्टी मिळावी, सुट्टीनंतर संबंधित नर्सेसला इतर वॉर्डमध्ये ड्यूटी मिळावी जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग  कमी होईल. मागील अनेक वर्षापासून नर्सेसची रिक्त पदे आहेत, ती भरण्यात यावीत, अशा अनेक मागण्या फेडरेशनने सरकारकडे केल्या आहेत. मात्र राज्य सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत फेडरेशनने व्यक्त केली आहे.