बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकला. यासंदर्भात धनंजय मुंडेंना प्रश्न केल्यास उत्तरताना धनंजय मुंडेंनी भाजपावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी अनेक विषयांवर दिलखुलास वक्तव्य केले आहे.

मुंबई : राजकीय बदला घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीपर्यंत आपण पोहचू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यापर्यंत जाणे आणि ईडीचा वापर करणे अशा गोष्टी मागील काहि दिवसांपासून सुरु आहेत. भारतीय जनता पार्टीला ईडीच एक दिवस संपवणार आहे. ( BJP will end ED) हे माझं वाक्य तुम्हि लिहून घ्या असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते पुण्यात एका आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकला. यासंदर्भात धनंजय मुंडेंना प्रश्न केल्यास उत्तरताना धनंजय मुंडेंनी भाजपावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी अनेक विषयांवर दिलखुलास वक्तव्य केले आहे. जातीयवाचक नावे हटवण्याच्या निर्णयावरही मुंडेंनी भाष्य केले आहे. सरकारी रेकॉर्डवर जी जातीयवाचक नावे आहेत. ती पहिले काढली पाहिजेत असा प्रस्ताव आपण समोर आणला आहे. हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यावर जो नियम केला जाईल त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या जातील. असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे.

केंद्राने केलेला कायदा शेतकऱ्यांना संपवणारा – धनंजय मुंडे

केंद्र सरकारने केलेला कायदा हा देशातील शेतकऱ्यांना संपवणारा आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना पायदळी तुडवत आहे. आदी हेच सरकार शेतकऱ्यांना सुरुवातील विश्वास देते आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना पायाखाली तुडवणारे सरकार आहे. देशातील शेतकरी संपला तर आपला शेतीप्रधान देशही संपेल.