दहावीचा निकाल १५ जुलैनंतर; आठवड्याभरात बारावीसाठी असाईमेंट फॉर्म्यूल्याची घोषणा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या असाईमेंटचे रिपोर्ट सबमिट करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, मुंबईतील १७ टक्के शाळांनी रिपोर्ट सादर केला नाही. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर लागणार आहे.

    मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकदा का सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांची असाईमंेट रिपोर्ट आल्यानंतर १० दिवसांत निकाल घोषित करण्यात येईल.

    माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या असाईमेंटचे रिपोर्ट सबमिट करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु, मुंबईतील १७ टक्के शाळांनी रिपोर्ट सादर केला नाही. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर लागणार आहे.

    शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, १५ ते २० जुलैदरम्यान दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर आठवड्याभरात बारावीसाठी असाईमेंट फॉर्म्यूलाची घोषणा करण्यात येणार आहे.