hsc exam english subject only one question paper for all

मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची भूमिका घेऊन त्यासंदर्भातील पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र सध्या राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-शिक्षकांचा विचार करता परीक्षेबाबत शेवटच्या टप्यात निर्णय न घेता शक्य तेवढ्या लवकर निर्णय घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

    मुंबई : वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून विद्यार्थ्यांच्या मानसिकेतेचा विचार करून दहावी, बारावीच्या परीक्षा मुक्त वातावरणात घेण्यात यावी यासाठी दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती मराठी शाळा संस्थाचालक संघातर्फे करण्यात आली आहे.

    मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची भूमिका घेऊन त्यासंदर्भातील पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र सध्या राज्यामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-शिक्षकांचा विचार करता परीक्षेबाबत शेवटच्या टप्यात निर्णय न घेता शक्य तेवढ्या लवकर निर्णय घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

    मूल्यमापन व परीक्षेचे स्वरूप शिथिल करून मुक्त वातावरणात या परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा, असे मत संस्थेच्या बैठकीत मांडण्यात आले.

    परीक्षेच्या कार्याचे विकेंद्रीकरण स्थानिक पातळीवर विभागवार किंवा जिल्हावार करून जिथे परीक्षा घेण्यायोग्य परिस्थिती आहे अशा ठिकाणी परीक्षा घेण्यासोबत पेपर तसापणी सुद्धा स्थानिक पातळीवर करता येईल का याचा विचार व्हायला हवा. परीक्षेचे नियोजन करण्याआधी कोणत्याही वयोगटाचा विचार न करता सर्व शालेय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सरसकटपणे लसीकरण करून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा.

    अशा प्रकारची भूमिका मराठी शाळा संस्थाचालक संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून मांडली आहे. या भूमिकेचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी सांगितले.