लॉकडाऊनचे नाव घेताच ‘या’ उद्योजाकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना परखडपणे सुनावले

उद्धवजी, लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची तयारी राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे. सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि मृतांचा आकडा या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परखड बोल सुनावले आहेत. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं”, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. विरोधकांकडून देखील राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याला विरोध केला आहे.

    मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला!

    आपल्या ट्वीटमधून आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देखील दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    नुकतीच आरोग्य विभागातील आणि कोविड टास्क फोर्समधील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन संदर्भात सूचना केल्या आहेत. “जर नागरिकांकडून सातत्याने कोविड संदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल, तर लॉकडाऊनसारख्याच निर्बंधांची तयारी सुरू करा”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.