YES Bank founder Rana Kapoor arrested; ED's big action

YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना संक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. ईडीने रात्री उधीरा ही कारवाई केली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई : YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना संक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. ईडीने रात्री उधीरा ही कारवाई केली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी यापूर्वी ईडीने मेहुल ठाकुर आणि मदन गोपाल चतुर्वेदी यांना अटक केली. या प्रकरणी अटक झालेले राणा हे तिसरे व्यक्ती आहेत.

तब्बल ६५०० कोटी रुपयांचा गैरव्यहाराचा आरोप असलेल्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अ‌ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे मुख्य आरोपी आहेत. यानंतर राणा देखील या प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात सापडले.

येस बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांचा संपूर्ण परिवार संशयाच्या भोवऱ्यात आहे. राणा कपूर यांची पत्नी बिन्दू कपूर, त्यांच्या तीन मुली राखी, रोशनी आणि राधा यांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. बेकायदेशीर कर्ज मिळूवन देण्याच्या बदल्यात राणा कपूर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.