होय, मला ईडीची नोटीस मिळाली; अखेर एकनाथ खडसेंचा खुलासा

होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनेने दिले आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत असून मला सहानुभूतीच मिळत असल्याचे खडसे म्हणत असल्याचेही या वृत्त वाहिनीने आपल्या वृत्तात म्हंटले आहे.

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविले असल्याची चर्चा शुक्रवार पासून सुरु आहे. अखेर खडसे यांनी या वृत्ताबाबात आपली प्रतिक्रिया दिली आहे. नोटीस मिळाल्याची बातमी खरी असल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे.

होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनेने दिले आहे. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत असून मला सहानुभूतीच मिळत असल्याचे खडसे म्हणत असल्याचेही या वृत्त वाहिनीने आपल्या वृत्तात म्हंटले आहे.

एका भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ खडसे यांनी सहा वर्षांचा राजकीय वनवास भोगला होता. त्यानंतर आता पून्हा एकदा त्यांना ईडीची नोटीस आली. पून्हा एकदा त्यांचे राजकीय भवितव्य अडचणीत येवू शकते.

ईडीने खडसेंना पाठविलेल्या नोटीसमध्ये ३० डिसेंबरला हजर राहण्याची आदेश दिले आहेत. अद्याप नोटीस मिळाली नाही, नोटीस मिळाल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी शुक्रवारी दिली होती.

ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत हे अद्याप समजू शकलेले नाही.