योगींच्या दौऱ्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली – उप्रचे मंत्री सिंह यांची टीका

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांची झोप उडाली

 

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(yogi) हे दोन दिवसांसाठी मुंबई(Mumbai) दौऱ्यावर होते. मुंबईमधील बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याविषयीच्या हालचाली त्यांनी या दोन दिवसीय दौऱ्यात केल्या. त्यांच्या या दौऱ्यावरुन अनेक शाब्दिक चकमकी घडत आहेत. यावर आता उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी टीका केली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे(CM Udhav Thakare ) यांची झोप उडाली आहे असे ते म्हणाले.
याबरोबरच भाषेचे गैरवापर करणे ही शिवसेनेची संस्कृती असू शकते अशी टीका करतानाच बॉलिवूडच्या (Bollywood) लोकांकडून मोठ्या मनाने आमचं स्वागत केलं गेलं. शिवसेनेने दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये. त्यांनी सर्वांत आधी बॉलिवूडसोबतच आपल्या संस्कृतीलाही सुधरावं. जर त्यांना फिल्म सिटी आपल्याकडे ठेवायची असेल तर त्यांनी ती जरुर ठेवावी. कुणीही ती दूर करायला आलं नाहीये. ही एक स्पर्धा आहे असेही सिंह म्हणाले.