You just escaped on bail; Don't speak too loudly ... Chandrakant Patil's stern warning to Chhagan Bhujbal

पश्चिम बंगालमध्ये एकट्या ममता बॅनर्जी भाजपला भारी पडल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला चितपट करत पुन्हा एकदा सत्ता काहीज केली आहे. या विजयनांतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना थेट भाजपवर निशाणा साधला. यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे.

    मुंबई : पश्चिम बंगालमध्ये एकट्या ममता बॅनर्जी भाजपला भारी पडल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला चितपट करत पुन्हा एकदा सत्ता काहीज केली आहे. या विजयनांतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना थेट भाजपवर निशाणा साधला. यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे.

    पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. “बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. दिवसाआड सभा घेतल्या. अनेक मंत्र्यांनी तर मतदारसंघातच ठाण मांडला होता. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न ठरले असून प.बंगालच्या जनतेने भाजपला स्पष्टपणे नाकारले आहे. ‘मेरा बंगाल नहीं दूंगी म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या. केवळ प. बंगालच नव्हे तर संपूर्ण देशातच आता भाजपविरोधी लाट तयार झाली असल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी जबरदस्त पलटवार दिला आहे.

    तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा तुम्हाला महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला”, असं चंद्रकात पाटील म्हणाले. “पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे असं कसं होऊ शकत असेही पाटील म्हणाले.