“तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की… ” ईडीच्या कारवाईवर संजय राऊत यांचं सूचक ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवल्यानंतर या कारवाईविरोधात खासदार संजय राऊत यांनी तीव्र निषेध करत आम्ही कोणाला घाबरत नाही असं म्हटलं. तसंच ईडी किंवा इतर यंत्रणांनी राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये, असं म्हटलं

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवल्यानंतर या कारवाईविरोधात खासदार संजय राऊत यांनी तीव्र निषेध करत आम्ही कोणाला घाबरत नाही असं म्हटलं. तसंच ईडी किंवा इतर यंत्रणांनी राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये, असं म्हटलं.सोमवारी पत्रकार परिषदेत ईडी तसंच भाजपावर गंभीर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

 

ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी ‘कोणामध्ये किती जोर आहे’ पाहूया अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी अजून एक शायरी ट्विट केली आहे. “मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न झाला, तेव्हा मी उभारी घेतली आहे” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.संजय राऊत यांनी सोमवारी धमकावलंही जातं असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हटलं होतं. यासंबंध बोलताना ते म्हणाले की, “मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही”. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.