उद्धव ठाकरे मुलासह तुम्हाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल – निलेश राणे

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर निलेश राणेंनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले... की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण राज्यात खुपच तापले आहे. या प्रकरणात आता राजकारणी हस्तक्षेप करत असल्यामुळे याला राजाकारणाचा रंग लागला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर राजकारण प्रचंड तापले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने सुनावणी सुरु आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्या ठाकरे यांचे नाव आल्याचे भाजपचे आमदार निलेश राणे यांनी दावा करत आहेत. यावर निलेश राणेंणी उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला आहे. 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर निलेश राणेंनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले… की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे. असे निलेश राणे यांनी महटले आहे.