तुम्ही बोलताना महिलांचा सन्मान होईल अशीच विधाने करा, नाहीतर…; चित्रा वाघ यांचा राऊतांना ईशारा

संजयजी राऊत काल तुम्ही स्मृती इरानी यांच्याबद्दल जे बरळलात त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे? ते सांगा, असं म्हटलं आहे. तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलं की,मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तुम्ही बोलताना महिलांचा सन्मान होईल, अशीच विधाने करा. नाहीतर आम्हालाही आरेला कारेची भाषा चांगलेप्रकारे येते. हे तुम्ही चांगलच ध्यानात ठेवा, अशा शब्दात त्यांनी सूचक इशाराही दिला आहे.

    मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

    चिंत्रा वाघ काय म्हणाल्या?

    संजयजी राऊत काल तुम्ही स्मृती इरानी यांच्याबद्दल जे बरळलात त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे? ते सांगा, असं म्हटलं आहे. तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलं की,मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तुम्ही बोलताना महिलांचा सन्मान होईल, अशीच विधाने करा. नाहीतर आम्हालाही आरेला कारेची भाषा चांगलेप्रकारे येते. हे तुम्ही चांगलच ध्यानात ठेवा, अशा शब्दात त्यांनी सूचक इशाराही दिला आहे.

    राऊत काय म्हणाले होते?

    दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री करण्यात आलं आहे. आधी ते पेट्रोलियम मंत्री होते, मी त्यांना ओळखतो. कालपर्यंत ते रॉकेल, पेट्रोल विकत होते. याआधी रमेश पोखरियाल होते. ते शाळेतच गेले नव्हते पण ते देशाचे शिक्षणमंत्री होते. त्याच्याआधी स्मृती इराणी होत्या त्या मॉडेलिंग करायच्या. म्हणजेच शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण घडवतात अशा शब्दात राऊत यांनी टीका केली होती.