तरूणाला चार वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश, शिपाईपदावर तातडीने नियुक्त करण्याचे मॅटचे आदेश

२०१७ मध्ये कामगार विभागातील शिपाई पदाच्या भरतीसाठी निघाली होती. त्यासाठी कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालूक्यात राहणाऱ्या सुधाकर इंगळे तरूणाने खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला. भरतीसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी परीक्षांमधील लेखी उत्तर पत्रिकेची एक कार्बन प्रत प्रत्येक उमेदवाराला देण्यात आली होती.

    मुंबई : चार वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर सुधाकर इंगळे तरूणाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)च्या अध्यक्षा न्या. मृदुला भाटकर आणि सदस्य प्रविण दीक्षित यांच्या खंडपीठाने तातडीने सेवेत घेण्यात आदेश दिले आणि कामगार विभागातील शिपाईपदाच्या भरती परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवूनही नोकरी नाकारण्यात आलेल्या तरूणाला मॅटने मोठा दिलासा दिला.

    २०१७ मध्ये कामगार विभागातील शिपाई पदाच्या भरतीसाठी निघाली होती. त्यासाठी कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालूक्यात राहणाऱ्या सुधाकर इंगळे तरूणाने खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला. भरतीसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी परीक्षांमधील लेखी उत्तर पत्रिकेची एक कार्बन प्रत प्रत्येक उमेदवाराला देण्यात आली होती. त्याची उत्तर पत्रिकेशी पडताळणी केली असता सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्याने सुधाकरला १०० पैकी १०० गुण मिळून तो खुल्या प्रवर्गात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने येईल, अशी खात्री होती.

    परंतु प्रत्यक्षात मात्र, सुधाकरला ९६ गुण मिळून तो ८ व्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले. याची खातरजमा करण्यासाठी कामगार विभागाकडून जेव्हा उत्तरपत्रिकेच्या प्रत मागवली असता २ प्रश्नाची उत्तरे देताना एकापेक्षा जास्त पर्यायांवर खूण केल्याने त्याचे नाकारात्मक असे ४ मार्क कमी झाल्याचे सांगत त्यास गुणवत्ता यादीत ८ क्रमांकावर स्थान देण्यात आले. त्यामुळे त्याची नियुती होऊ शकली नाही. या गुणवत्ता यादीलाच सुधाकरने अ‍ॅड. धैर्यशिल सुनार यांच्यामार्फत मॅटमध्ये आव्हान दिले.

    त्यावर मॅटच्या अध्यक्षा न्या. मृदुला भाटकर आणि सदस्य प्रवीण दीक्षित यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. कामगार विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संगनमताने सुधाकरच्या उत्तर पत्रिकेत छेडछाड केली असल्याचा दावा अ‍ॅड. सुतार यांनी आरोप केला. तसेच उत्तर पत्रिकेतील लेखणीची शाई आणि प्रत्यक्षात सुधाकरकडून वापरण्यात आलेली लेखणीची शाई वेगवेगळी असल्याचे न्याय्य वैद्यकीय तपासणी अहवालातून समोर आल्याचे स्पष्ट करत तो अहवालही अ‍ॅड. सुतार यांनी खंडपीठाकडे सादर केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायाधिकरणाने सुधाकरला एका आठवड्यात शिपाईपदावर नियुक्त करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.