Best's fleet will include state-of-the-art double decker buses; Sophisticated facilities with two doors, two stairs, CCTV cameras

कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होत वाहक आणि चालक म्हणून काम करणाऱ्या बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील काही वाहक आणि चालकांना बेस्टकडून मदत मिळाली. मात्र हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याएवढा असून यापैकी बहुतांशा मृत कोरोना यौध्दांच्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब नोकरी आणि विम्याच्या रक्कमेच्या प्रतीक्षेत आहे. दूर्दैवी म्हणजे बेस्टचे वाहक म्हणून काम करणारे प्रभाकर तांबे यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचे कुटूंब आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. वाईट म्हणजे सातत्याने पत्रव्यवहार करूनदेखील तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मदत मिळणार नाही, असे उत्तर बेस्टने दिल्याने तांबे कुटुंबियांनी मदतीसाठी याचना केली आहे.

  मुंबई : कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होत वाहक आणि चालक म्हणून काम करणाऱ्या बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील काही वाहक आणि चालकांना बेस्टकडून मदत मिळाली. मात्र हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याएवढा असून यापैकी बहुतांशा मृत कोरोना यौध्दांच्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब नोकरी आणि विम्याच्या रक्कमेच्या प्रतीक्षेत आहे. दूर्दैवी म्हणजे बेस्टचे वाहक म्हणून काम करणारे प्रभाकर तांबे यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचे कुटूंब आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. वाईट म्हणजे सातत्याने पत्रव्यवहार करूनदेखील तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मदत मिळणार नाही, असे उत्तर बेस्टने दिल्याने तांबे कुटुंबियांनी मदतीसाठी याचना केली आहे.

  उदय प्रभाकर तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट प्रशासनात नोकरी करणारे त्यांचे वडील कोरोना योद्धा प्रभाकर धनू तांबे यांच्या पश्चात आमच्या परिवाराला बेस्ट प्रशासन काहीही मदत करण्यास तयार नाही. प्रभाकर तांबे हे दिंडोशी बस आगारात वाहतूक विभागात बस वाहक म्हणून काम करत होते. त्यांचा कोरोनामुळे १ जून २०२० रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात कमविणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला बेस्टमध्ये नोकरी मिळावी. शासनाने जाहिर केलेल्या विम्याचे पैसे मिळावेत, यासाठी बेस्ट प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला आहे.

  शिवाय सातत्याने पाठपुरावा देखील केला. हा पाठपुरावा सुरु असतानाच १५ मार्च २०२१ रोजी उदय प्रभाकर तांबे यांना बेस्ट भवनातून फोन आला. या फोनद्वारे तुमच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही. म्हणून तुम्ही पुन्हा दुसरा अर्ज भरा. आणि यासाठी तुम्हाला बेस्ट भवनात यावे लागेल.

  दरम्यान, बेस्टकडून मिळत असलेल्या अशा वागणूकीमुळे उदय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उदय यांच्या वडिलांचे निधन कोरोनामुळे झाले आहे, असे मनपाने दिलेल्या सर्टिफिकेटवर नमुद करण्यात आले आहे. मात्र बेस्ट यास दाद देत नाही. यामुळे त्यांना मानसिक त्रास होत असून, आपणास न्याय मिळावा, असे म्हणणे सातत्याने उदय मांडत आहेत.

  उदय तांबे यांच्या साठी माजी आमदार हुसेन दलवाई यांनी बेस्ट प्रशासनास पत्र लिहिले आहे. तसेच फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सहित बेस्ट महाव्यवस्थापक यांना लेखी निवेदनाद्वारे तांबे यांना नोकरी मिळावी व शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत सुद्धा त्वरित देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

  तांबे परिवाराला न्याय मिळाला नाही तर तांबे परिवारासह आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसहित आझाद मैदान येथे आंदोलन करू. कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांना अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांनी प्रशासना कडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  - विनोद घोलप, अध्यक्ष, फाईट फॉर राईट फाऊंडेशन