युवक काँग्रेस करणार महाराष्ट्रातील सर्वात मोठया रक्तदान शिबिराचे आयोजन; २५००० रक्तपिशव्या संकलन करण्याचा सत्यजीत तांबेंचा निर्धार

    मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सध्या कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण पाहता रक्ताचा तुडवडा देखील मोठ्या प्रमाणात भासत आहे आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस मार्फत महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन युवक काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.

    मागच्या वर्षी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पुढाकाराने राज्यभरात राबवलेल्या रक्तदान शिबिरामार्फत २८५० ० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. तरी आपण मागील वर्षीप्रमाणे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करत पुन्हा एकदा रक्तदान शिबिर घ्यायचे असून, किमान २५ हजार रक्तपिशव्यांचे संकलन करायचे आहे, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

    मागच्या वर्षी युवक कॉँग्रेसने वर्षभर चालवलेल्या उपक्रमात पन्नास लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष अन्न धान्य व जेवणाचे वाटप, लाखो लोकांना मास्क आणि आर्सेनिक एल्बम ३० औषधांचे वाटप, कोरोना योध्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबवले होते. याहीवर्षी युवक कॉँग्रेस सर्व प्रकारची मदत महाराष्ट्रभर करेल असा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे.