youth was doing dangerous Stunts on 22 storey building video goes viral social media in kandivali west mumbai three booked
२२ मजली इमारतीवर तरुणाची स्टंटबाजी, सोशल मीडियावरील व्हिडिओ पडला महागात

कांदिवलीत (Kandivali) एका २२ मजल्याच्या इमारतीवर (22 story building) तरुण स्टंट (youth stunt) करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाने या  स्टंटचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (video) स्व:ताच सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) केला. यानंतर पोलिसांनी (police) स्टंट करणाऱ्या तरुणासह व्हिडिओ तयार करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : कांदिवलीत एका २२ मजल्याच्या इमारतीवर तरुण स्टंट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाने या  स्टंटचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ स्व:ताच सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणासह व्हिडिओ तयार करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणाची आणि इमारतीची ओळखही पटवली आहे.

कांदिवली पश्चिम येथील जय भारतीय को ऑपरेटिव्ह सोसायटीत २२ व्या मजल्यावर धोकादायक स्टंट करत होता, त्यावेळी त्याच्या दोन साथीदारांनी त्याच्या या स्टंटचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला.

काय आहे या व्हिडिओत ?

या व्हिडिओत २२ व्या मजल्याच्या इमारतीच्या वरच्या फ्लोअरवर बसून एक तरुण एनर्जी ड्रिंक पिताना दिसतो. त्यानंतर हा तरुण दोन फूट अंतरावर असलेल्या इमारतीच्या किनाऱ्यावर उडी घेतो, आणि तिथे स्टंट करत तो हातांवर उलटा उभा राहतो. स्टंट करण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी दररोज करण्यात येत असलेल्या नवनव्या प्रयोगांमुळे अनेक तरुणांना जीव गमवावा लागत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल कांदिवली पोलिसांनी घेत तातडीने कारवाई केली आहे.

कांदिवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही तरुणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्या इमारतीवर हा तरुण स्टंट करत होता, त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी भेट दिली, तसेच शेजारच्यांना या प्रकाराची माहिती होती का, याचीही विचारणा केली आहे. या तिन्ही तरुणांबाबत चौकशी केल्यानंतर आता या तरुणांना अटक होण्याची शक्यता आहे.