Yusuf Lakdawala dies in Arthur Road Jail

    मुंबई : फिल्म प्रोड्युसर(Film Producer) आणि बिल्डर(Builder) युसूफ लकडावाला(Yusuf Lakdawala) याचा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू झाला आहे. प्रकृती बिघडल्याने त्याने जे जे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
    मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी केल्याप्रकरणी प्रकरणात ईडीने 2019 मध्ये त्याला अटक केली होती. त्यांनतर 2020 मध्ये त्याला ईडीने अटक केली. तेव्हा पासून ते जेलमध्येच आहे. लकडावाला याला कॅन्सर झाला होता. यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
    दिवंगत लेखक मुल्कराज आनंद यांची खंडाळा येथे जमीन आहे. ती जमीन त्यांना हैदराबादचे नवाब हिमायत नवाझ जंग बहाद्दूर यांनी त्यांना दिली होती. युसुफ लकडवाला यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन बळकावली. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाने एप्रिल २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता.
    गुन्हा दाखल होताच युसुफ लकडवाला हे लंडनला पळून जाण्याच्या बेतात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अहमदाबाद विमानतळावर अटक केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना जामीन मिळाला. यानंतर ईडीने त्यांना अटक केली. लकडावाला बॉलिवूड आणि डी गँगला फायनान्स करायचे. त्यांच्या मृत्यू हा डी गँगसाठी जबरदस्त झटका मानला जात आहे.