corona in dharavi

धारावीत आज तर कमालच झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये धारावीत एकाही(Dharavi Records Zero patient Today) कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

    मुंबई : कोरोनाचा संसर्ग(Corona spread) सुरु झाल्यानंतर धारावीत कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षी झपाट्याने वाढली होती. त्यावेळी धारावी(Dharavi) कोरोना हॉटस्पॉट(Corona Hotspot) जाहीर करण्यात आली होती. मुंबई पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे हळुहळू परिस्थिती सुधारली आणि तिथले कोरोनाचे थैमान कमी होऊ लागले. धारावीत आज तर कमालच झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये धारावीत एकाही(Dharavi Records Zero patient Today) कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल रोजी धारावी येथे सर्वाधिक ९९ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे पहिल्या लाटेत महापालिकेची चिंता वाढली होती. मात्र दुसऱ्या लाटेत धारावीत कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.


    गेल्या मंगळवारी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर धारावी येथे कोरोनाच्या नवीन ६ रुग्णांची नोंदली गेली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळल्याने धारावीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

    अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ६,८४४ पर्यंत पोहोचली आहे. तर ६,४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत २० रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. जी / उत्तर वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेने जाहीर केली. या वॉर्डमध्ये येणाऱ्या देखील दादरमध्ये ३ तर माहिममध्ये ६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.

    महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,“हे मुंबई महापालिकेचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. ७ वेळा धारावी शून्यावर आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. धारावीकर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवलं आहे” .