नागपुरात आजपासून लॉकडाऊन; दारूची ऑनलाईल घरपोच सेवा

    नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात सोमवार, 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

    नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलिस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहे.

    या काळात उद्योग, सरकारी कार्यालये (25 टक्के उपस्थितीने) आणि भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया या अत्यावश्यक सेवादेखील सुरू राहतील. तर, लॉकडाऊन केलेल्या क्षेत्रातील सर्व खासगी कार्यालये, दारूची दुकाने बंद राहतील. मात्र दारूची ऑनलाईल घरपोच सेवा सुरू राहणार आहे.