नागपुरात गुरुवारी आढळला ०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोना पॉझिटिव्ह आणि ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घसरण सुरुच

नागपूर शहरात गुरुवारी Corona Active रुग्णांचे प्रमाणही घटल्याचे जाणवून आले. आज केवळ 87 कोरोना Active रुग्ण आढळले. जेव्हा की, मागील काही दिवसांपूर्वी Active रुग्णांची आकडेवारी 100च्या पलीकडे होती.

    नागपूर (Nagpur): मनपा प्रशासनाच्या (the municipal administration) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (third wave of corona) रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या (the number of corona patients) शून्यावर आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. मनपाकडून करण्यात येत असलेल्या सकारात्मक प्रयत्नांचे फलित दिसू लागले आहेत. आरोग्य विभागाकडून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात आज केवळ ०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.

    नागपूर शहरात गुरुवारी Corona Active रुग्णांचे प्रमाणही घटल्याचे जाणवून आले. आज केवळ 87 कोरोना Active रुग्ण आढळले. जेव्हा की, मागील काही दिवसांपूर्वी Active रुग्णांची आकडेवारी 100च्या पलीकडे होती. योग्य उपचारांमुळे नागपुरातील 3 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण आकडेवारी बघता 3 लाख 34 हजार 60 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

    नागपू मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरात गुरुवारपर्यंत 10 लाख 89 हजार 620 रुग्णांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. याप्रमाणे 4 लाख 52 हजार 718 रुग्णांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली. शहरातील एकूण लसीकरणाची आकडेवारी 15 लाख 42 हजार 338 इतकी नोंदविली गेली.