नागपुरात मंगळवारी आढळले ०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या घटतीवर

प्रभावी वैद्यकीय उपचारांमुळे शहरातील 03 कोरेाना अॅक्टिव्ह रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 90 इतकी नोंदविण्यात आली. आरोग्य विभागाकडून मंगळवारी 3413 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

    नागपूर (Nagpur) : नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागातर्फे (the Health Department) करण्यात येत असलेल्या अथक परिश्रमामुळे नागपुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (The number of corona positive patients) झपाट्याने घटली आहे. दरम्यान विभागतर्फे प्राप्त अहवालानुसार शहरात मंगळवारी केवळ 02 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहे. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू (patient dying from corona) झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही.

    प्रभावी वैद्यकीय उपचारांमुळे शहरातील 03 कोरेाना अॅक्टिव्ह रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 90 इतकी नोंदविण्यात आली. आरोग्य विभागाकडून मंगळवारी 3413 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 3410 रुग्णांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला. आरोग्य विभागातर्फे मंगळवारी 10 लाख 67 हजार 482 रुग्णांना कोरोनाचा पहिला डोज देण्यात आला.

    तर 4 लाख 42 हजार 226 रुग्णांना कोरोनाचा दुसरा डोज देण्यात आला. कोरोनाला आटोक्यात आणताणा आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.