नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी आढळले ०३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; कोरोनाचा प्रभाव ओसरला

नागपूर जिल्ह्यात (Nagpur district) कोरोना विषाणूचा (Corona virus) जोर ओसरला; मात्र दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे (new corona positive patients in Nagpur on Friday) प्रशासनाची चिंता (the administration) वाढत आहे. मनपाच्या आरोग्य विभागास (the health department of the corporation) शुक्रवारी जिल्ह्यात ०३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद (The registration of corona positive patients) प्राप्त झाली.

    नागपूर (Nagpur):  जिल्ह्यात (Nagpur district) कोरोना विषाणूचा (Corona virus) जोर ओसरला; मात्र दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे (new corona positive patients in Nagpur on Friday) प्रशासनाची चिंता (the administration) वाढत आहे.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागास (the health department of the corporation) शुक्रवारी जिल्ह्यात ०३ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद (The registration of corona positive patients) प्राप्त झाली. यामध्ये नागपूर शहरातील ०२ आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णसंख्या ०१ आहे.

    मिळालेल्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. योग्य उपचार पद्धतीमुळे जिल्ह्यातील 09 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यात 69 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये शहरातील 66, ग्रामीण भागातील 01 आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णसंख्या 01 इतकी नोंदविण्यात आली.

    जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये याकरिता आरोग्य विभागाने कोरोना टेस्टिंगची आकडेवारी वाढविली आहे. यादरम्यान शहरात शुक्रवारी 5207 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील 4024 रुग्णांची आणि ग्रामीण विभागातील 1183 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. नागपुरात केरळप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट आल्यास स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. नागरिकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शहर महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.