नागपुरात गुरुवारी ०४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर मनपाच्या आरोग्य विभागानेही कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न चालविले आहेत.

    नागपूर (Nagpur): महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर मनपाच्या आरोग्य विभागानेही कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान नागपुरात गुरुवारी 47 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले. यासह आज नोंदविण्यात आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी 04 इतकी नोंदविण्यात आली.

    आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे गुरुवारी 03 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले. प्रशासनाकडून गुरुवारी 3216 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 3209 संशयित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी करण्यात आलेली नाही.

    आरोग्य विभागाकडून गुरुवारपर्यंत 12 लाख 48 हजार 572 रुग्णांना कोरोनाची पहिली लस टोचण्यात आली. यासोबतच आतापर्यंत 53 हजार 993 रुग्णांना कोरोनाची तिसरी लस टोचण्यात आली. शहरात एकूण लसीकरणाची आकडेवारी 17 लाख 79 हजार 565 इतकी नोंदविली गेली. गणेशोत्सव काळात वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे कटाक्षाने पालन करावे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.