नागपुरात रविवारी ०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; रुग्णांचा आकडा वाढल्याने प्रशासन चिंतेत

    नागपूर (Nagpur). नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाने (The health department) रविवारी 06 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद केली. जेव्हा की, शनिवारी हाच आकडा केवळ 02 इतका नोंदविण्यात आला होता. शहरात कोरोना अॅटिव्ह रुग्णसंख्येत (corona active patients) वाढ झाली असून ती ४३ वर पोहोचली आहे.

    कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने प्रभावी उपचार पद्धतीवर भर दिला आहे. शहरात रविवारी ०४ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचे नोंदविले गेले. यासह रविवारी एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची शहरात अद्यापपर्यंत नोंद नाही. शहरात रविवारी ३०७६ कोरोना संशयित रुग्णांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली.

    यापैकी ३०६८ टेस्टिंग कोरोना निगेटिव्ह आढळून आली. शहरात सध्यापर्यंत १२ लाख ६३ हजार ६०१ नागरिकांना कोरोनाची पहिली लस तर ०५ लाख ४१ हजार ३२८ जणांना कोरोनाची दुसरी लस टोचण्यात आली. शहरात सध्यापर्यंत १८ लाख ४९२९ नागरिकांचे कोरोना लसिकरण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.