नागपुरात शुक्रवारी आढळले ०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मेगाप्लॅन’

    नागपूर (Nagpur):  जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असले तरी राज्य शासनाने तिसरी लाट थोपविण्याकरिता युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात कोरोना व्हॅक्सिनेशनचे प्रमाण दुपटीने वाढविण्याचा निर्धार नागपूर मनपा प्रशासनाने केला आहे.

    मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात शुक्रवारी 07 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरातील 03 रुग्ण आणि ग्रामीण भागातील 04 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. आरोग्य विभागाकडून शुक्रवारी 4569 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.

    यापैकी 3096 रुग्ण शहरातील तर ग्रामीण भागातील 1473 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 08 इतकी नोंदविली गेली. गणेशोत्सव काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून कोरोनाचा प्रादूर्भाव टाळावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडून करण्यात आले.