१२ दिवसांच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; शहरवासी हळहळले

जन्मानंतर अवघ्या 12 दिवसातच बालकाचा कोरोनामुळे मृत्यू (The baby died of corona just 12 days after birth) झाल्याची घटना रविवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालय या (a government medical hospital) अर्थात मेडिकल काॅलेजमध्ये घडली. बाळ 20 जून रोजी जन्मले; मात्र सहा दिवसांनंतर त्याला ताप (fever) आल्याची डाॅक्टरांनी त्याची कोरोना चाचणी (doctors tested his corona) केली.

    नागपूर (Nagpur). जन्मानंतर अवघ्या 12 दिवसातच बालकाचा कोरोनामुळे मृत्यू (The baby died of corona just 12 days after birth) झाल्याची घटना रविवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालय या (a government medical hospital) अर्थात मेडिकल काॅलेजमध्ये घडली. बाळ 20 जून रोजी जन्मले; मात्र सहा दिवसांनंतर त्याला ताप (fever) आल्याची डाॅक्टरांनी त्याची कोरोना चाचणी (doctors tested his corona) केली.

    अहवाल पाॅझिटिव्ह (positive) आल्याने बाळाच्या आईचीही (The baby’s mother) कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु, तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. (corona report came back negative)

    2 जुलै रोजी या बाळाचा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला इतर काही कॉम्प्लिकेशन देखील होत्या. या बाळाचं हृदय योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

    महाराष्ट्रात 3 जुलै रोजी एकूण 9 हजार 489 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. तर या 24 तासांमध्ये 8 हजार 395 रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 45 हजार 315 कोरोना बाधित बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96 टक्के इतकं झालं आहे.

    राज्याच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असताना मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 575 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 851 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 8 हजार 297 सक्रीय रुग्णांवर उपचार केले जात आहे.