प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पोलीस कर्मचाऱ्याचा कोविड 19 रिपोर्ट पॉजिटिव आल्यानंतर पुण्याला गेलेल्या 33 पैकी 20 पोलिसांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 कर्मचारी पॉजिटिव आढळले आहेत. या सर्व कोरोना पॉजिटिव पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले असून उर्वरित 13 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या आज करण्यात येणार आहे.

    नागपूर (Nagpur) : नागपुरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर (Signs of corona wreckage) होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण नागपूर पोलिस दलातील (Nagpur police force) 12 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते मागील काही दिवसांपूर्वीच पुणे येथून प्रशिक्षण घेऊन परतले. यानंतर प्रकृती बिघडू लागल्याने त्यांची कोरेाना तपासणी करण्यात आली. या बाराही जणांचा कोरोना अहवाल (The corona report) पॉझिटिव्ह आला असल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली.

    राज्यात कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. परंतु तिसऱ्या लाटेचीही भीती यंत्रणांनी व्यक्त केली आहे. नागपुरात देखील कोरोनाचा ग्राफ उतरता असताना बाहेरून नागपुरात परतणारे अनेक जण कोरोना बाधित आढळत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु करण्यात आले आहे.

    नागपूर पोलीस दलातील 33 पोलीस कर्मचारी ३० ऑगस्टला पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी येथे 10 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण पूर्ण करून 10 सप्टेंबरला नागपुरात परत आल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप व खोकला सारखी सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याची सूचना दिली.

    त्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोविड 19 रिपोर्ट पॉजिटिव आल्यानंतर पुण्याला गेलेल्या 33 पैकी 20 पोलिसांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 12 कर्मचारी पॉजिटिव आढळले आहेत. या सर्व कोरोना पॉजिटिव पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले असून उर्वरित 13 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या आज करण्यात येणार आहे.

    शिवाय या सर्व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्याही करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आलेल्या 12 पैकी 9 कर्मचाऱ्यांनी लसींचे दोन्ही डोज घेतले आहेत. सर्व बाधित पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती पोलीस रुग्णालयाचे डॉक्टर संदीप शिंदे दिली आहे.