धक्कादायक प्रकार ! चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन तरूणीवर अतिप्रसंग, आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या

चॉकलेट देण्याच्या आमिषाने नराधमाने १२ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या बालिकेने कशीबशी नराधमाच्या तावडीतून आपली सुटका केली. त्यानंतर तिने हा सर्व किळसवाणा प्रकार तिच्या आईला सांगितला.

    अमरावती : चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, चॉकलेट देण्याच्या आमिषाने नराधमाने १२ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या बालिकेने कशीबशी नराधमाच्या तावडीतून आपली सुटका केली. त्यानंतर तिने हा सर्व किळसवाणा प्रकार तिच्या आईला सांगितला.

    पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरुन बाल लैंगिक कायद्या अंतर्गत (पॉक्सो) नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विजय जवंजाळ याला अटक केली आहे. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे. या संदर्भात शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे अधिक तपास करत आहेत.