सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट, १५०० कोटींची उलाढाल ठप्प

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो.

    नागपूर : सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती.