नागपुरात बुधवारी १६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद; तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) ओसरल्यानंतर आता ‘डेल्टा प्लस’ (Delta Plus) या नव्या विषाणूचा (new virus) प्रादूर्भाव रुग्णांमध्ये (patients) होत आहे. प्रशासनाने (The administration) यावर नियंत्रण मिळविण्यासाठी (to control) कंबर कसली असून 100 डेल्टा प्लस रुग्णांचे नमुने ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे’ (the National Virology Laboratory) पाठविले आहेत.

    नागपूर (Nagpur). कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) ओसरल्यानंतर आता ‘डेल्टा प्लस’ (Delta Plus) या नव्या विषाणूचा (new virus) प्रादूर्भाव रुग्णांमध्ये (patients) होत आहे. प्रशासनाने (The administration) यावर नियंत्रण मिळविण्यासाठी (to control) कंबर कसली असून 100 डेल्टा प्लस रुग्णांचे नमुने ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे’ (the National Virology Laboratory) पाठविले आहेत. दरम्यान नागपुरात बुधवारी (Wednesday) 16 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत.

    नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, कोरोनामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. कोरोनामुळे शहरात आतापर्यंत 5302 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची आजची आकडेवारी 66 नोंदविण्यात आली. आजची कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 460 आहे. आरोग्य विभागाकडून बुधवारी 7896 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आजच्या तारखेपर्यंत नागपूर जिल्ह्यात 2 लाख 20 हजार कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

    प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेचा विचार करता लाॅकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेला रोखायचे असल्यास नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.