नागपुरात शनिवारी आढळले १९७ कोरोना रुग्ण; शहरात सध्या ४२९५ कोरोना Active रुग्ण

नागपूर (Nagpur) जिल्हा प्रशासनाकडून (the district administration) शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १९७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यासह मागील 24 तासात ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्हा प्रशासनाकडून (the district administration) शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १९७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यासह मागील 24 तासात ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    योग्य उपचारामुळे शनिवारी ४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद करण्यात आली. आजच्या एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी ७१ रुग्ण ग्रामीण भागातील, १२३ रुग्ण नागपूर शहरातील आणि ३ रुग्ण नागपूर जिल्ह्याबाहेरील असल्याचे नोंद करण्यात आले. ०६ मृत रुग्णांपैकी ०३ रुग्ण नागपूर शहरातील, ग्रामीण भागातील ० आणि ०३ रुग्ण नागपूर शहराबाहेरील आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.