नागपुरात शनिवारी आढळले 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; Active रुग्णसंख्येत झपाट्याने घट

    नागपूर (Nagpur) : नागपुरात कोरोना Active रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे. शहरात शनिवारी (09 ऑक्टोबर) केवळ 32 Active रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शहरात शनिवारी 02 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली.

    आज कोरोनामुळे एकही रुग्ण बरा झाल्याची नोंद नाही ही विशेष बाब! आरोग्य विभागाकडून 2871 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यापैकी 2863 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला. विशेष म्हणजे, कोरोनामुळे आजसुद्धा एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. आरोग्य विभागाकडून शनिवारी 14 लाख 47 हजार 688 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक पहिली लस टोचण्यात आली. कोरोना प्रतिबंधक असलेली दुसऱ्या क्रमांकाची लस घेणाऱ्याची आजची संख्या 7 लाख 36 हजार 50 इतकी आहे.

    नागपूर शहरात शनिवारी 21 लाख 83 हजार 738 लसिकरण पार पडले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांनी स्वतःहून कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ‘नवराष्ट्र न्यूज नेटवर्क टीम’कडून करण्यात येत आहे.