मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्रात २ विशेष गाडया ; मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया ट्रेन शुक्रवारपासून धावणार

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया एक्स्प्रेस या दोन विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, ९ व १० ऑकटोबरपासून या गाड्या सुरु होणार असून, या गाड्या पूर्णपणे आरक्षीत असून, ८ आॅक्टोबर पासून आरक्षण सुविधा www.irctc.co.in  या वेबसाइटवर सुरू होईल. दरम्यान या प्रवासात नागरिक आणि प्रशासनाने कोविड-१९ पासून बचावासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –
गाड़ी क्रमांक ०२२९० मुंबई ते नागपूर दुरंतो : ही विशेष गाडी ९ आॅक्टोबर पासून नागपूर रेल्वेस्थानक येथून दररोज रात्री ८. २० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. गाड़ी क्रमांक ०२१८९ डाउन मुंबई ते नागपुर दुरंतो ही विशेष गाडी १०आॅक्टोबर पासून मुंबई स्टेशन येथून दररोज रात्री ८.१५ वाजता रवाना होऊन दिवशी सकाळी ७.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल. या गाडीला फक्त भूसावळ येथे पाच मिनिटांचा थांबा असणार आहे.

गाड़ी क्रमांक ०२१०५ मुंबई – गोंदिया : ही विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सायंकाळी ७.०५ वाजता मुंबई स्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ११.२० वाजता गोंदिया स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज पहाटे ४.१५ वाजता अकोला स्थानकावर येईल. गाड़ी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया ते मुंबई ही विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज दुपारी ३ वाजता गोंदीया रेल्वेस्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज रात्री ८.५५ वाजता अकोला स्थानकावर येईल.