२० मीटर उंच, १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपुरात दाखल

जम्बो ऑक्सिजन टँक नागपुरात दाखल झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपुरात दाखल झाला आहे. हा 'स्टोरेज टँक' मनोरुग्णालयाच्या परिसरात बसवण्यात येणार आहे.

    नागपूर (Nagpur).  जम्बो ऑक्सिजन टँक नागपुरात दाखल झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपुरात दाखल झाला आहे. हा ‘स्टोरेज टँक’ मनोरुग्णालयाच्या परिसरात बसवण्यात येणार आहे. हा टँक सध्या अमरावती रोड, गोंडखैरी येथे असून रात्रीपर्यंत नागपुरात दाखल होणार आहे. हा टँक 13 जुलै रोजी चेन्नईवरून निघाला आणि आज नागपूरच्या सीमेवर दाखल झाला आहे.

    58 चाकं असलेल्या कंटेनरमधून हा टँक नागपुरात आणण्यात आला. 9 दिवसांचा प्रवास करत नागपुरात पोहचला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते, त्यातून प्रशासनाने धडा घेत ही व्यवस्था केली असून याचा फायदा नागपूरच नव्हे तर विदर्भालासुद्धा होणार आहे. हा जम्बो टँक 20 मीटर उंच तर 40 टन वजन असलेला देशातील सर्वात मोठा ऑक्सिजन स्टोरेज टँक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.